
(New Dellhi )नवी दिल्ली : (Congress MP Rahul Gandhi)काँग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या भाषणानंतर एका वादाने डोके वर काढले. राहुल यांच्यावर महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा गंभीर आरोप (Union Minister Smriti Irani)केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी (Rahul Gandhi flying kiss) केला. संसदेत बोलताना इराणी यांनी हा आरोप केला. त्या म्हणाल्या, मला एका गोष्टीवर माझा आक्षेप व्यक्त करायचा आहे. ज्यांना माझ्यासमोर बोलण्याचा अधिकार दिला होता त्यांनी आज निघताना अशोभनीय वर्तन केले. ही असभ्य व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाइंग किस देऊ शकते. या देशाच्या सभागृहाने असे अनादरपूर्ण आचरण कधीच पाहिले नाही. ही त्या कुटुंबाची लक्षणे आहेत, हे आज देशाला कळले, असा आरोपही त्यांनी केला.
काय घडला प्रकार ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचे भाषण संपल्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडत असताना त्यांचे काही कागदपत्रं जमिनीवर पडले. राहुल गांधी हे कागदपत्रं उचलण्यासाठी खाली वाकले, तेव्हा भाजप खासदार हसायला लागले. त्यानंतर राहुल गांधींनी ट्रेझरी बेंचकडे बघून फ्लाइंग किस दिला आणि ते हसत निघून गेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अध्यक्षांकडे तक्रार
दरम्यान, भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी राहुल गांधींबाबत अध्यक्षा ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी भाजपा खासदार स्मृती इराणी यांच्याकडे पाहून अयोग्य हावभाव केल्याचा आणि सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा आरोप महिला खासदारांनी केला आहे.