अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान

0

07MREG23 अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान

लासलगाव, 7 मे (हिं.स.) अवकाळी पावसामुळे शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे.लासलगाव सह निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गेल्या काही दिवसापासून नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतकरी पुरता हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासन कडून अजून पर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही.या अवकाळी पावसामुळे बळीराजा ची झोप उडाली आहे.गेल्या काही दिवसापासून लासलगाव परिसरात कधी माध्यम तर कधी जोरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील कांद्याचे पोळ पाण्याखाली गेले आहे शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांद्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीच सामना करताना शेतकरी कांदा झाकण्यासाठी व नंतर तो उघडा करताना भलताच मेटाकुटीला आला आहे.भर उन्हाळ्यात पावसाळ्या सारखे वातावरण झाले आहे.कधी दिवसा तर कधी रात्रीच्यावेळी अवकाळी पाऊस झटका देत आहे या मुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांदा पिकांचे गारपीट मुळे सर्वधिक नुकसान झाले आहे.अगोदरच कांद्याला भाव नाही. एकरी साथ ते सत्तर हजार रुपये खर्च करून शेतकर्यांनी कांद्याचे पीक घेतले.उन्हाळ कांदा पावसात भिजल्याने व बदलत्या हवामानामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान शेतकरी ने करावे काय? असे प्रश्न पडला आहे.