महालक्ष्मी अनसूया माता ब्रह्मलीन दिनी, विविध धार्मिक कार्यक्रम

0

नागपूर: विश्वमोहिनी अनसूया माता (पारडसिंगा निवासिनी) यांच्या मंगळवार २५ व्या ब्रह्मलीन दिनानिमित्त शांतिभवन, दिगडोह हिंगणा येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रभाकरराव देशमुख, गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, गिरीश चंद्रशेखर वऱ्हाडपांडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, जानबा मस्के आणि बजरंगसिंह परिहार यांना यानिमित्ताने आमंत्रित केले होते. तसेच उपसरपंच . कैलासजी गिरी, हर्षलता गौतम मेश्राम, मंगलाताई रडके, जि. प. सदस्या सौ. रश्मी कोटगुले, सुभाष वऱ्हाडे, डॉ. रमेश पाटील, गणेश धानोरकर यांच्या उपस्थितीत अनसूया माता मंदिर शांती विद्या भवन डिगडोह प्रांगणात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अन्नदान व प्रसादाकरिता ऍड. प्रमोद शिंदे, संजय खटी, प्राची ढोले परिवार, सोपानराव सिरसाट, अजय धोटे, राजू सावळे, विनोद पानतावणे व भक्तगण संजू सालवटकर, प्रभाकरराव देशमुख, राजेंद्र आसलकर, ममता ढोरे, वसंत घटाटे, पी. एस. चौबे यांनी सहकार्य केले.


सकाळी ७.३० ते ९ .०० वाजेपर्यंत मातेचे मंगलस्नान आचार्य विवेक त्रिपाठी व रामजी त्रिपाठीसह पूजा, अर्चना, होम, हवन कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ९.३० वाजता दिंडी सोहळा डिगडोह (देवी) येथे प्रदक्षिणा जगदीश बँड पार्टी देविदास अडांगळे यांच्या मंगलधूनसहीत काढण्यात आला. सकाळी १० वाजता महाप्रसाद वितरण करण्यात आले. दिलीप पनकुले परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली. दुपारी छप्पनभोग व नैवेद्य चढविण्यात आला. सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पांडे, विजय कोटगुले, अभिजित शेंडे, नितीन रडके, योगेश मोहुर्ले, दीपक रडके, फैजल शेख, भीम तिवारी, अंकित कोल्हे, अनिता फ्रांसीस, डॉ. प्रकाश राठोड, अनिल यावलकर, संजय शेवाळे, सौ. श्रृती सुधीर मुलमुले, सरदार रवींद्र मुल्ला, प्रमोद वानकर, बबलू चौहान, देविदास अडांगळे, गजानन मुळे आदि भक्तगण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा