महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात

0

नागपूर :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या दक्षिण नागपूर विभाग अध्यक्षा सौ. स्नेहा खोब्रागडे यांच्या नेतृत्वात तसेच दक्षिण उपविभाग अध्यक्षा सौ. ममता ठाकरे, विभाग सचिव सौ. वैशाली गिरी यांच्या उपस्थितीत महिला दिन उत्साहात साजरा झाला. नागपूर शहर अध्यक्ष विशाल भाऊ बडगे व चंदू भाऊ लाडे यांच्या मार्गदर्शनात तसेच दक्षिण विभागाचे विभाग अध्यक्ष अंकित भाऊ झाडे यांच्या सहकार्याने जरीपटका पोलीस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक विद्याताई काळे व त्यांच्या सहकारी, सक्करदरा पोलिस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल सौ. प्रमोदीनी आष्टनकर व त्यांच्या सहकारी, लोकमच्या महिला पत्रकार सुरभी शिरपूरकर व गणेश रुग्णालयाच्या डॉ. सौ. रुपाली प्रवीण डांगोरे यांचे शाल, पुष्पगुच्छ व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
समाजाप्रती आपले सर्वस्व अर्पण करून अखंड सेवा पुरविणाऱ्या प्रतिष्ठित महिलांचा सत्कार करून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्या ह्या कृतीचे मान्यवरांनी स्वागत केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा