अकोला बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे पॅनल विजयी

0

 

अकोला : अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठया अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. अकोला बाजार समितीमध्ये सहकार पॅनल विरुद्ध शिव शेतकरी पॅनलने निवडणुक लढविली होती. मागील अनेक वर्षांपासून अकोला बाजार समितीवर सहकार पॅनलचे वर्चस्व आहे ते याही निवडणुकीत त्यांनी कायम ठेवले आहे. तर
अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समिती मधील सर्व 18 जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. तर या निवडणुकीत वंचित समर्थित पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे.अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक अकरा जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सभापती राष्ट्रवादीचा होणार याचा मार्गही सुकर झाला आहे. तर इथे भाजप पाच, उद्धव ठाकरे गट दोन अशा प्रकारे हया जागा निवडून आल्या आहेत.