सरकारच्या दंडेलशाहीमुळे चिघळले बारसु प्रकरण, राजू शेट्टी यांचा आरोप

0

 

सोलापूर : स्थानिकांचा प्रकल्पाला मोठा विरोध आहे. ज्यावेळी घरातल्या महिला बाहेर पडतात हे कोणत्या भाडोत्री माणसाचं काम नाही.सरकारच्या दंडेलशाहीमुळे बारसू प्रकरण चिघळले आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
2013 च्या भूमी अधिगृहन कायद्याप्रमाणे शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येत नाही. चार – दोन गुजराती माणसानी संमती दिली म्हणजे शेतकऱ्यांनी संमती दिली असे होत नाही. ज्यावेळी मी स्वतः बारसूला जाईल तेव्हा सांगुन माणसं घेऊन जाणार आहे. तुमच्या अश्रूधुराच्या नळकाड्या संपतील, बंदुकीतल्या गोळ्या संपतील पण आम्ही एवढी माणसं आणु की, ते संपणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी लोकमतांचा आदर करून हा प्रकल्प रद्द करावा. सरकारने जर प्रकल्प स्थलांतर किंवा रद्दची घोषणा केली तर आज जे सरकारच्या विरोधात आहेत, तीच लोक सरकारचा जयजयकार करतील. मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्यानंतर आंदोलन चिघळले हा योगायोग असू शकत नाही. पोलीस बळाचा वापर होतोय हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही असं म्हणणं भाबडेपणाचं लक्षण ठरेलं. कारवाई होताना मी सुट्टीवर होतो असं म्हटल्याने त्याच्यावर शिंतोडे उडणार नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांच्या इच्छे विरोधात कारवाई होत असावी म्हणून मुख्यमंत्री रजेवर गेले असावेत. त्याचबरोबर राज्यात अशी परिस्थिती असताना मुखमंत्र्यांना सुट्टीवर जाण्याचा अधिकार नाही. जो राज्याचा प्रमुख असतो त्याला व्यक्तिगत मत नसते त्याला राज्याचे हित बघावे लागते.दरम्यान, शनिवार – रविवारची महसूल आणि कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशी परखड भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी घेतली आहे.