Home Breaking news राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना महावितरणतर्फे अभिवादन

राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना महावितरणतर्फे अभिवादन

0

नागपूर, दि. 23 जानेवारी 2026: भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे झंझावात ‘नेताजी’ सुभाषचंद्र बोस आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या नागपूर परिमंडलात या दोन्ही महान सुपुत्रांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ या मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रप्रेम आणि समाजहिताचा वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला.मुख्य अभियंता दिलिप दोडके, अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य आणि संजय वाकडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, महाव्यवस्थापक (वित्त) अतुल राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक सुधीर टेकाम, सचिन लहाने आणि योगेश विटनकर उपस्थित होते.

केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर नेताजींचा ‘शिस्तबद्ध लढा’ आणि बाळासाहेबांची ‘निर्भीड वृत्ती’ यांचा आदर्श समोर ठेवून काम करण्याची प्रेरणा यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी, अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व अन्य अधिकारी-कर्मचारी.