तब्बल ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव, ग्राहकांना हरकती मांडण्याचे आवाहन
नागपूर. राज्यातील वीजग्राहकांना (electricity consumers ) जबर ‘शॉक’ देण्याची तयारी महावितरणने (MSEDCL) केली आहे. पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीच्या मागणीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे (MERC) याचिका दाखल केली आहे. अभ्यासकांनी दोन वर्षांचा हिशेब मांडून ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के असल्याचे म्हटले आहे. अभूतपूर्व विक्रमी अशा या प्रस्तावाला विरोध दर्शविण्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने वीजग्रहकांना केले आहे. महावितरणने याचिकेतून आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी केली आहे. ही याचिका सार्वजनिक करताना वेगळेच गणित मांडले आहे. प्रत्यक्षात ही दरवाढ ३७ टक्के असल्यावर ग्राहक संघटना ठाम आहेत. इलेक्ट्रिसिटी ड्यूटी एकूण वीज आकारावर घरगुती वीज ग्राहकांना १६ टक्के, व्यापारी वीज ग्राहकांना २१ टक्के, औद्योगिक वीज ग्राहकांना ७.५ टक्के भरावी लागेल. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना ही दरवाढ शॉक देणारी असून, येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर ढकलणारी असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हणले आहे.
महावतरणने केली धूळफेक२०२३-२४ मध्ये ८.९० रुपये प्रति युनिट व २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये प्रति युनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी आहे. सरासरी वाढ दाखविताना अनुक्रमे १४ टक्के व ११ टक्के दाखविली आहे. महावितरणने मांडलेले गणित म्हणजे ग्राहकांच्या डोळ्यांत केलेही धूळफेक आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे ३७ टक्के आहे. १० टक्क्यांवर दरवाढ हा टॅरिफ शॉक ठरतो. त्यामुळे १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करताच येऊ शकत नाही. यानंतरही साऱ्या संकेतांचे उल्लंघन करीत महावितरणने याचिका दाखल केली असल्याचे प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.
प्रस्तावित दरवाढ
ग्राहक वर्गवारी सध्याचे दर २०२३-२४ २०२४- २५
० ते १०० युनिटस् ३.३६ ४.५० ५.१०
१०१ ते ३०० युनिटस् ७.३४ १० ११.५०
३०१ ते ५०० युनिटस् १०.३७ १४.२० १६.३०
५०० युनिटस् वर ११.८६ १६.३० १८.७०
फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |