मुरैना : सराव मोहिमेवर असलेली वायुसेनेची दोन विमाने मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. (Air Force Fighter Jets Crash near Muraina) या विमानांमध्ये वायुसेनेच्या सुखोई-३० आणि मिराज-२००० विमानांचा समावेश असून या विमानांनी ग्वाल्हेर तळावरून उड्डाण घेतले होते. बॉम्बिंगच्या मोहिमेवर असलेल्या विमानांचे विंग्ज धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती पुढे येत असून तीन वैमानिकांपैकी दोन सुखरूप असल्याची माहिती पुढे आली आहे. सुखोई-३० विमानात दोन तर मिराज-२००० विमानात एका वैमानिकाचा समावेश होता. यापैकी सुखोईच्या वैमानिकांचा शोध लावण्यात यश आले आहे तर मिराज-२००० विमानाच्या वैमानिकाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले. संरक्षण दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून घटनास्थळावर स्थानिक प्रशासनाकडून बचाव मोहिम राबविली जात आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेनाप्रमुखांकडून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. संरक्षणमंत्र्यांनी वैमानिकांच्या सुरक्षेबाबतही माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही.
पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra