‘मन की बात’ श्रद्धा, पूजा आणि व्रत

0

पंदप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना : अनेकदा भाऊक झाल्याची कबुली

मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांचा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ (Man Ki Baat ) चा रविवारी 100 वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे देश-विदेशात 4 लाख ठिकाणी प्रसारण झाल्याचे सांगतिले झात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा नुसता कार्यक्रम नाही तर माझ्यासाठी श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे. भगवंताच्या रूपातील जनता जनार्दनच्या चरणी हे प्रसादाचे ताट आहे. माझ्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास झाला असल्याची भावना व्यक्त केली. 100 व्या भागासाठी श्रोतेही अभिनंदनास पात्र आहेत. कार्यक्रमा दरम्यान हजारो संदेश मिळालेत. ते वाचताना भावूक होतो. भावनेत वाहून गेलो, पण वेळीच स्वतःला सांभाळले, अनेकवेळा रेकॉर्डिग नव्याने करावे लागल्याची कबुली त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण प्रवासाची वाटचाल उलगडली. 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या दिवशी मन की बातचा प्रवास सुरू केला. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण. हा सण दरमहा साजरा करण्यात आला. एवढी वर्षे झाली यावर विश्वास बसत नाही. प्रत्येक एपिसोड नवा असतो. देशवासीयांचे नवे यश यात तपशीलवार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटातील लोक यात सहभागी होतात. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. तुम्ही लोकांनी ते करून दाखवले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत मी ‘मन की बात’ केली. तेव्हा जगभरात त्याची चर्चा झाली. मन की बात ही माझ्यासाठी इतरांच्या गुणांची पूजा करण्याची संधी आहे. माझे मार्गदर्शक लक्ष्मण राव होते, ते म्हणायचे की आपण इतरांच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले आहे. त्यांची ही गोष्ट मला प्रेरणा देते. हा कार्यक्रम इतरांकडून शिकण्याची प्रेरणा बनला आहे. ते मला तुमच्यापासून कधीच दूर जाऊ देत नाही.