Maratha Reservation : जरांगेंचे ओबीसींबद्दल मोठे विधान!

0
Maratha Reservation : जरांगेंचे ओबीसींबद्दल मोठे विधान!
Maratha Reservation :

 

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar):- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेले मुदत संपली आहे. आता त्यांनी २० जुलैला आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची घोषणा केली. पण त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाबद्दल एक मोठे विधान करून जरांगे यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

संभाजीनगरातील क्रांती चौकात त्यांनी मराठा बांधवांना संबोधित केले. त्यावेळी मंत्री भुजबळांसाठी पुन्हा एकदा एकेरी भाषा त्यांनी वापरली, त्याच संदभनि एक मोठे विधानही केले. छगन भुजबळ मला चौथी शिकलेला, गावठी म्हणाले. आता मी भुजबळांना कचका दाखवतो. वेळ आली तर १५ दिवसांच्या आत ओबीसी समाजाचे २७ टक्के आरक्षण रद्द करून दाखवेन’ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) आता चागलेच आक्रमक झाले आहेत, मनोज जरांगेनी सरकारला सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली होती. ती मुदत 13 जुलैला संपली. पण सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अलीकडेच जरांगेनी शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन केले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीनंतर आता छत्रपती संभाजीनगर अशी ही रॅली पार पडली. १३ जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेनी मराठा समाज बांधवांना संबोधित केलं.

भुजबळांचा उल्लेख करताना जीभ घसरली

मनोज जरांगे राज्य सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर तुटून पडले. छगन भुजबळ मला चौथी शिकलेला, गावठी म्हणाले होते. आता भुजबळांनी समोर यावं मी त्यांना कचका दाखवतो, असं जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगेनी छगन भुजबळांचा पुन्हा एकदा एकेरी भाषात उल्लेख केला. वेळ आली तर 15 दिवसांच्या आत ओबीसी समाजाचे 27 टक्के आरक्षण रद्द करून दाखवेन, पण मला ओबीसी समाजाचं वाटोळ करायचे नाही, म्हणून मी शांत आहे, असं जरांगे म्हणाले.

मुंबईत पोहचण्याचा इशारा

मराठे मुंबईला येऊ शकतात. ही मराठ्यांची शांतता रॅली आहे. शांततेच युद्ध कोणालाही पेलता येत नाहीत. सरकारला दिलेली वेळ पाळली नाही. यामुळे येत्या २० तारखेपासून उपोषणाला बसतोय, असे जरागे पाटील म्हणाले. तसेच २० तारखेलाच मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवणार, एकंदरीत मराठा आदोलन रौद्ररूप धारण करेल, असे जरांगेनी म्हटले आहे, सरकारच्या वतीने शंभूराज देसाईनी मराठा समाजाने आणि जरांगेनी संयमी भूमिका घ्यावी असे म्हटले आहे.

 

Manoj jarange patil history in marathi
Manoj Jarange Patil Wikipedia
Manoj Jarange Wikipedia
Manoj Jarange Patil Biography
Manoj Jarange Age
Manoj Jarange Patil family
Manoj jarange patil photo
manoj jarange-patil village name