भंडारा : शहरातील बी एस एन एल मुख्य कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड रुमला आज पहाटे 5.30 वाजता भीषण आग लागली. खोलीतून आगीचे लोळ व धूर निघू लागल्याने कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनी याची महिती कार्यालयीन प्रमुखांना दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ ही महिती अग्निशमन दलाला दिली. थोड्या वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले. तब्बल साडेतीन तासानंतर आग विझविण्यात यश आले.