अकोला : वाण धरणाचे पाणी तेल्हारा आणि अकोट तालुक्यातीलच शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळावे या मागणीसाठी आता आमदार देशमुख यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये वारी धरणावर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पाण्याचे राजकारण होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.अमृत योजना आणि बाळापुर तालुक्यातील पाणीपुरवठा शासन निर्णय रद्द करावा आणी शेतीसाठी पाणी आरक्षित ठेवावे आणी पाणी वापर संस्थाचे पुनर्जीवन करावे व पाणी वापर संस्थांवरील बिल पूर्णपणे माफ करावे आणी कॅनल गेट आणि पाटसऱ्यांची दुरुस्ती करावे आणी विदर्भ वॉटर ग्रिट स्थापन करून (मराठवाड्याच्या धरतीवर) बंद पडलेले जलविद्युत केंद्र चालू करावे या मागणीसाठी लोकजागर मंच चे अनिल गावंडे यांच्या सह ग्रामस्थांनी 20 एप्रिल पासुन वान धरणाच्या पायथ्याशी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.