राहुल गांधी, उद्धव ठाकरेंमध्ये मॅचफिक्सिंग, मनसेचा टोला

0

 

मुंबईः स्वा. सावरकरांबद्धल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना मालेगाव येथील जाहीरसभेत इशारा दिला. आता त्याचे वर्णन मनसेने मॅचफिक्सिंग असे केले आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेला इशारा म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा टोला मनसेने लगावला (MNS on Uddhav Thackeray) आहे.

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण, सहन करणार नाही म्हणजे काय करणार? हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, या शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे समाचार घेतला आहे. राहुल गांधी अपमान करत राहणार आणि उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देणार, हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी स्थिती आहे. उद्या राहुल गांधी हे पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान करतील. मग हे काय फक्त सामनात अग्रलेख लिहिणार की घरी बसून अंडी उबवणार? नेमकं करणार काय ते त्यांनी सांगावं” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे ते म्हणणार की आम्ही अपमान सहन करणार नाही आणि तिकडे राहुल गांधी अपमान करीत राहणार. त्यापेक्षा कारवाई काय करणार, हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे. काँग्रेससोबतची युती तोडणार का? महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही मनसेने म्हटले आहे.