Weather updates: हवामान खात्याने दिला मोठा इशारा

0

विदर्भात अतिमुसळधार पाऊस (Heavy rain in Vidarbha)

(Mumbai)मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो, ठाणे (Thane), रायगड (Raigad), सिंधुदुर्गसाठी ऑरेंज, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन इटनकर (District Disaster Management Authority Chairman Vipin Itankar)यांनी नागपूर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने 18 ते 21 जुलै दरम्यान वर्तवलेल्या अतिष्टीच्या ऑरेंज अलर्ट च्या अनुषंगाने सतर्क राहायला सांगितले. नदी नाले दुथडी वाहत असताना, पुलावरून पाणी वाहत असताना तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडीमधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे देखील सांगण्यात आल आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना आज #सुट्टी जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील भंडारा (Bhandara), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha) जिल्ह्यात तसेच नागपूरच्या बहुतांश ठिकाणी अति मुसळधार पाऊस पुढील दोन तासात पडण्याची शक्यता आहे तर अकोला, बुलढाणा जिल्ह्यात हलका #पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूरच्या पूर्व नागपूरच्या वाढोडा परिसरात सखल भागात पाणी शिरले असून, नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ,वर्धा व यवतमाळ ह्या जिल्हयात काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह अतीमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि नागपूर शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे सर्वत्र वस्त्या जलमय झाल्या आहेत. जोरदार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. भिवापूर तालुक्यातील मांगली जगताप या सुमारे ५०० लाेकवस्तीच्या गावाकडे जाणारे सर्व रस्ते जलमय झाल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.

अतिवृष्टीमुळे आज दि 20 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीणच्या सर्व शाळा आणि कॉलेज यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी सांगितली.
रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा अनेक ठिकाणी पाणी साचले. लाखांदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव येथील नाल्यावरुन पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain in Vidarbha Today

Heavy rain in vidarbha tomorrow
Vidarbha weather Today
Heavy rain in Nagpur Today
Vidarbha weather 10 days
Rain alert in Nagpur
Vidarbha Weather 15 days
Red Alert in Nagpur Today