नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणाचा (Misuse of Central Investigation Agencies) गैरवापर होत असून त्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय. आता या मुद्यावर विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात १४ विरोधी पक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडले आहे. याप्रसंगी बोलताना सिंघवी यांनी सांगितले की, न्यायालयाने अटक आणि जामीन याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे.
विरोधी नेत्यांना अटक करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा मनमानी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या या याचिकेत करण्यात आला आहे. काँग्रेससह आम आदमी पार्टी, डीएमके, आरजेडी, बीआरएस, टीएमसीसह 14 राजकीय पक्षांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ एप्रिल रोजी यावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणता युक्तिवाद केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात धाव
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा