मिसेस युनिव्हर्सचा खिताब तृप्ती शिरपूरकर यांना

0

नागपूर:

घोरपड रोड येथील रहिवासी असलेल्या तृप्ती शिरपूरकर यांनी आग्रा येथील खुशी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे फतेहाबाद येथे आयोजित मिसेस क्लासिक स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स 23 चे विजेतेपद पटकावले आहे. तृप्ती शिरपूरकर यांनी अनेक स्पर्धकांना पराभूत करून हा मुकुट पटकावला आहे. तृप्ती शिरपूरकर यांना लहानपणापासूनच अभ्यासासोबतच फॅशनच्या क्षेत्रातही रस आहे. आता त्यांना फॅशनसोबतच मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात देखील नाव कमवायचे आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आयआरएस रघुनाथ भारती, विशेष अतिथी सामाजिक कार्यकर्ते, भिलगाव ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा महिला आघाडी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष लतेश्वरी ब्रम्हा काळे, अध्यक्ष रौनक सोळंकी, सचिव पूजा रावत यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम तीन फेऱ्यांमध्ये पार पडला. सौंदर्य स्पर्धेतील पहिली फेरी वधूच्या पोशाखावर आधारीत होती. दुसऱ्या फेरीत स्पर्धकांनी आपली ओळख करून दिली तर शेवटची गाऊन फेरी होती. नागपूर, कोलकाता, बंगळुरू, भोपाळ, अलिगड, प्रयागराज, हाथरस आणि आग्रा येथील विविध स्पर्धकांनी रॅम्पवर कॅटवॉक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डॉ. रेणू यादव यांनी स्पर्धैचे परीक्षण केले. फॅशन डिझायनर करिश्मा शर्मा निर्मित वस्तू परिधान करून मॉडेल्सनी कॅटवॉक केला. यावेळी रिया माथुर, सुनीता सिंग, रजनी चहर, कमलेश कुमारी, खुशबू, आदि, मेडी, अमन, अमित, कोरिओग्राफर अंशिका सक्सेना आदींची प्रमुख उपस्थिती होती. अलाहाबादची अवनी मिस युनिव्हर्स सीझन – 4ची विजेती, कामठीची तृप्ती शिरपूरकर मिसेस क्लासिकची आणि नागपूरची मृणाली मिसेस प्लॉटिनमची विजेती ठरली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा