दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू, मंत्रिपदाचा दर्जा

0

 

अमरावती- जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगासाठी लढा सुरु होता.अखेर आमदार बच्चू कडू यांना राज्य शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा दिला गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार
शासनाने परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला. गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगांसाठी बच्चू कडू लढत आहेत.