Home political आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आमदार रवी राणांची सरकारकडे मागणी

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आमदार रवी राणांची सरकारकडे मागणी

0

 

अमरावती – अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा आमदार रवी राणा यांनी उभारला होता. मात्र ठाकरे सरकारमध्ये हा पुतळा हटविण्यात आला. त्यानंतर राणा समर्थक आणि शिवप्रेमींनी आंदोलन केले. ठाकरे सरकारच्या काळात आंदोलन करताना गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी देखील आंदोलन करण्यात आले होते. सध्या अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात यावर तारीख पे तारीख चालू आहे. त्यामुळे आमदार रवी राणांनी सरकारकडे हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.