बुलढाण्यात मनसेचे “एक सही संतापाची” अभियान बुलढाणा

0

– राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी पाहता जनतेमध्ये संताप आणि रोष असल्याचे सांगत राजकारण्यांच्या बाबतीत जनतेमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही त्यामुळे मनात असलेला संताप स्वाक्षरींच्या माध्यमातून व्यक्त व्हावा आणि एकदा तरी जनतेने राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसेच्या वतीने “एक सही संतापाची” हे अभियान राबवले जात असून बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे मनसे तालुका प्रमुख अमोल रिंढे यांच्या नेतृत्वात हे अभियान सुरू करण्यात आले आहे.