नागपूर : स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर कडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणावर अधिक भर घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जयप्रकाश नगर चौकात आकर्षक असे रंगीत कारंजे आणि भव्य आधुनिक शिल्पाकृती उभारण्यात आली आहे, जी वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे, अशा सुंदर रंगीत कारंजे आणि भव्य आधुनिक ABSTRACT शिल्पाकृतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री, नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार(ता. १९) रोजी करण्यात आले. ही शिल्पाकृति ABSTRACT वर्गामध्ये भारतातील सर्वात मोठी आहे.
याप्रसंगी आमदार श्री प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने, मनपाचे उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, अर्बन डेव्हलोपमेंटचे वास्तुविशारद श्री. हर्षल बोपर्डीकर, श्रीमती तेजल रक्षमवार, श्रीमती राशी बावनकुळे, श्री. गोरज बावनकुळे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरला आधुनिक, राहणेयोग्य आणि सुंदर शहर बनविण्याचे प्रयत्न मनपाचे आहेत.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या अशा जयप्रकाश नगर चौकात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रंगीत कारंजे लावण्यात आले आहे. कारंज्यामध्ये आकर्षक अशी रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली आहे. 20 विविध प्रकारचे कारंजे लक्षवेधी ठरत आहेत. कारंजाच्या वरच्या बाजूस ‘वसुधैव कुटुंबकंम चे’ फलक लावण्यात आले आहे. कारंजाच्या अगदी समोरच्या भागात भव्य ‘द इनस्पिरिट’ नावाची आधुनिक शिल्पाकृती तयार करण्यात आली आहे. ही शिल्पकृती जवळपास 48 फूट उंच असून, स्टनलेस स्टीलद्वारे तयार करण्यात आली आहे. या भव्य आधुनिक शिल्पाकृतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री, नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या लोकार्पण प्रसांगी नागपूरकरांची मोठा गर्दी बघायला मिळाली. अनेक जण फोटो, व्हिडिओ काढून आनंद लुटतांना दिसले. श्री.नितीन गडकरी यांनी देखील लोकांच्या आनंदात सहभाग घेत फोटो काढले. अहमदाबादचे श्री आणि श्रीमती बिलोरीया हे या भव्य आधुनिक शिल्पकृतीचे निर्मितीकार आहेत व कंत्राटदार मे.एम.एस.भांडारकर व साई कंस्ट्रक्शन नागपूर आहेत.