नागपूर : (nagpur) पाच वर्षांपूर्वीच्या (Pulwama attack)पुलवामा हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपांचा धागा पकडून राऊत यांनी पुलवामामध्ये सुरक्षा जवानांची हत्या करून त्याच्या राजकारणातून निवडणूक जिकण्याची योजना होती का, असा प्रश्न (MP Sanjay Raut comment on Pulwama Attack) उपस्थित केला आहे. संजय राऊत नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. (bjp)भाजपने नेमलेले राज्यपालच ही माहिती देत असल्याचे राऊत म्हणाले.
जम्मू काश्मीरचे (jamu kashmir)माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर आरोप केले आहेत. पुलवामा हल्ला झाला त्यादिवशी सायंकाळी आपण पंतप्रधान मोदी यांना फोन करून सरकारच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे सांगितले. त्यावेळी जवानांना विमान उपलब्ध झाले असते तर ही घटना घडली नसती, असे आपण मोदी यांना सांगितल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. खासदार(sanjay raut) संजय राऊत यांनी नेमक्या या विधानाचा धागा पकडून मोदी सरकारवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यात काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे, हे देशाला आधीच माहिती होते. पुलवामामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कसे काय पोहोचले, असा सवालही त्यांनी केला. सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे, असे राऊत म्हणाले.