मुंबई, 25 जून औरंग्याच्या समर्थनात घोषणाबाजीचा निषेध करणार की बाटगी भूमिका घेणार?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. बावनकुळे यांनी ट्टिटरवरुन ठाकरेंवर टीका केली आहे.
छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंग्याचा उदोउदो करणारी अवलाद पुन्हा डोकं वर काढत आहे. बुलडाण्यात असुदुद्दीन ओवेसींच्या भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. सरकारनं सत्य तपासून कारवाई करावी आणि दोषींना धडा शिकवावा. यापूर्वीही प्रकाशजी आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून आले ; पण हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत. आता किमान ओवेसीच्या सभेतील औरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहेत की बाटगी भूमिका घेणार आहेत?, असा सवाल त्यांनी केला आहे.