नामस्मरण- एक अद्भुत साधना

0

 

लेखांक २

कालच्या लेखात रा.कृ.कामत यांच्या पुस्तकाचा मी उल्लेख केला होता.या पुस्तकाबद्दल अनेकांनी चौकशी केली आहे.हे पुस्तक ढवळे प्रकाशनाचं आहे.छपाई खुप जुनी आहे.कामतांनी नामचिंतामणि या नावाचं अजुन एक पुस्तक लिहिलं आहे.या पुस्तकात त्यांनी नामस्मरणामुळे साधकांना आलेले अनुभव लिहिले आहेत.इतके अनुभव वाचल्यामुळे आपलं नामस्मरणही fail जाणार नाही,याची आपल्याला खात्री वाटु लागते आणि नामस्मरणाच्या होडीत आपण बसतोच..बसतो.हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.नामजपाचे महत्त्व या पुस्तकात नामस्मरणाचे फायदे आणि ते किती करावं,याबद्दल साद्यंत माहिती आहे.सद्गुरु वामनराव पै. यांनीही या पुस्तकाचा उल्लेख केला आहे.ही दोन्ही पुस्तके संग्रही ठेवावी,अशीच आहेत.कामतांचा कालखंड हा स्वातंत्र्योत्तर काळातला आहे.आत्ता ही पुस्तके मिळत असतील की नाही,शंकाच आहे.सर्वांनी आग्रह केला तर ढवळे प्रकाशन पुन्हा ही पुस्तके छापतीलही!!!