महागाई, डॉ आंबेडेकर स्मारक प्रश्नी नागपुरात काँग्रेस आक्रमक

0

नागपूर : अंबाझरी परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन तोडण्याच्या विरोधात तसेच बेरोजगारी, वाढत्या महागाईच्या विरोधात आज नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापासून मज्जाव करणाऱ्या पोलिसांशी काही काळ कार्यकर्त्यांची झटापट झाली.बॅरिकेड तोडून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत असल्याने वातावरण तापले. अखेरीस निवडक लोकांना आत सोडण्यात आले. शिष्टमंडळाची भेट घालून देण्यात आल्यानंतर वातावरण शांत झाले. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सोशल मीडिया विभाग प्रमुख विशाल मुत्तेमवार, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ आंबेडकर स्मारकाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत होता. भाजपचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताची धोरणे राबवत असल्याचा बडेजाव करीत असली तरी डिझेल,पेट्रोल, गॅस गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे याकडे या निमित्ताने लक्ष देण्यात आले. डिझलचे दर कमी करा, पाहिजे, बेरोजगाराना रोजगार द्या, आंबेडकर स्मारक तोडणा-यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, प्रदेश सचिव संदेश सिंगलकर,सचिव संजय महाकाळकर यांच्यासह आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष नंदा पराते, महिला अध्यक्षा नैश अली,अनिरुध्द पांडे, रमन पैगवार, माजी नगरसेवक रमेश पुणेकर, संदीप सहारे, शिला तराळे, मनोज सांगोळे,नेहा निकोसे,दिपक वानखेडे, भावना लोणारे, रश्मी धुर्वे, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, राजकुमार कमनानी, पंकज थोरात, पंकज निघोट, ज्ञानेश्वर ठाकरे,सुनील पाटिल,युवराज वैद्य, सुनिता ढोले, ईरशाद मलिक,गोपाल पटटम, योगेश कुंजलवार, अशोक निखाडे, ऍड. अभय रणदिवे, प्रशांत ढाकणे, किशोर गीद,विवेक निकोसे, उषा डवरे,मंदा वैरागडे,संजय सेलोट, सुभाष मानमोडे, मनीष उमरेडकर, नरेश खडसे, लंकेश ऊके, शुभम आमदरे, वैभव काळे आदी सहभागी झाले होते