विरोधकांनी आज कामकाजवर बहिष्कार टाकत विधान सभेच्या पायऱ्यांवर येऊन आंदोलन सुरू केले. सीमाप्रश्नावर विरोधकांनी सरकार हमको घबराती है, कर्नाटक को डरती है, कर्नाटक सरकार हाय हाय…अशा घोषणांनी सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून हातात निर्लज्ज सरकार असे लिहिलेले बॅनर घेऊन सरकारचा निषेध करीत स्वतःला खोके, महाराष्ट्राला धोके, खोके-बोके, कर्नाटक सरकार मुजोरी करते, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णी झोपते, सीमा प्रश्नी भूमिका घ्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांची सरबत्ती सरकारवर केली. घोषणाबाजी करीत सर्व सदस्य पायर्यावर बसले. यावेळी भास्कर जाधव यांनी रश्मी शुक्ला प्रकरण, एनआयटीचे भूखंड प्रकरण, शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येवू नये म्हणून गोंधळ घालून जयंत पाटलांचे निलंबन केले. हिंम्मत असेल तर आमच्या सर्वांचे निलंबन करा, असा इशाराही दिला. वर्षा गायकवाड यांनीही महापुरुषांचा अवमानप्रकरणी सत्ताधारी सदस्य व राज्यपालांवर परखड टीका केली.