नागपूर महानगरपालिकेचा सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सादर

0

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) सन 2024-25 च्या सुधारित आणि 2025-26 या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पाची सादरीकरण महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी 21 मार्च रोजी दुपारी एक वाजता केले. हे त्यांचे सलग दुसरे अर्थसंकल्पीय सादरीकरण आहे. महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, “मी 4 जुलै 2023 रोजी नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. माझ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असून तो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 103 व 104 अंतर्गत 2024-25 साठी सुधारित तर कलम 95, 96 आणि 100 अंतर्गत 2025-26 साठी प्रस्तावित स्वरूपात तयार करण्यात आला आहे.”

सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात नागपूर शहराच्या विकासाला गती देण्यावर भर दिला आहे. आर्थिक नियोजनानुसार अर्थसंकल्प दोन भागांत विभागलेला आहे. शहरातील रस्ते, पथदिवे, शिक्षण, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नागपूरला विकासाचे केंद्र म्हणून पुढे नेण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यरत आहे . नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी उत्पन्नाच्या मर्यादेत राहून तरतुदी करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

Nagpur Municipal Corporation Zone list
Nagpur Municipal Corporation Recruitment
Nagpur Municipal Corporation website
Nagpur Municipal Corporation water bill
Nagpur Municipal Corporation Contact Number
Nagpur Municipal Corporation Tax
Nagpur Municipal Corporation address
Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi