भारतीय सेनेचे मायक्रो लाईट साहसी अभियान बेंगलोरच्या दिशेने रवाना, उत्साहात नागपुरात स्वागत

0

नागपूर : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभ्रमणाला निघालेली मायक्रो लाईट विमाने नागपुरात आल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले. एडवेंचर रिंगचे नेतृत्वात हलक्या वजनाची ही 4 विमाने गया ते बंगलोर दरम्यान 5 हजार किलोमीटरच्या साहसी मोहीमेवर निघाली आहे. चार मायक्रो लाईट विमानांचा या 17 दिवसांच्या मोहिमेत समावेश आहे. तब्बल पाच हजार किलोमीटर अंतर ही विमाने कापणार आहेत. काही ठिकाणी एअर शो देखील होणार आहे. नागपूरवरून यवतमाळ ,नांदेडमार्गे पुढे बंगळुरूला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बदललेले हवामान, गारठा आणि वारा यामुळे काहीशा अडचणी असल्याची माहिती यावेळी बोलताना देण्यात आली. कर्नल लक्ष्मीकांत यादव हे टीम लीडर असून ब्रिगेडियर संदीप सिन्हा, कर्नल राहुल मनकोटिया, कर्नल विक्रम शेखावत , नायक प्रदीप सिंह, कर्नल पी पी सिंग, कर्नल डी. एस. फणसाळकर, लेफ्टनंट कर्नल अरुण प्रकाश, लेफ्टनंट कर्नल बीपी सिंग, लेफ्टनंट कर्नल अनुप कुमार सिंग, लेफ्टनंट कर्नल अमित सांगवन, लेफ्टनंट कर्नल दीप्ती शर्मा, मेजर पियुष शर्मा, नायक यादव कुमार विजय नायक यादव कुमार, राजकुमार रावजी, नायक विपिन शर्मा, शिपाई प्रफुल्ल फुकन,सुभेदार विनोद आदींचा समावेश आहे. ही मोहीम तरुणाईमध्ये हवाई सेवेचा विश्वास निर्माण करेल अशी माहिती शंखनादशी बोलताना या चमूतील सदस्यांनी दिली.असे मत व्यक्त केले नागपूर नंतर यवतमाळ नांदेड आणि पुढे बंगळूर असा या हवा ही मोहिमेचा प्रवास असणार आहे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा