ओमराजे निंबाळकर, जगजीतसिंह राणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच तू तू मै मै..

0

उस्मानाबाद : ठाकरे व शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सातत्याने चकमकी होत असून अशीच एक चकमक उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बघायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात पिकविम्याच्या (Omraje Nimbalkar & Jagjeet Singh Rana Patil) मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली. या चकमकीत दोघांनीही एकमेकांची औकात काढली. या चकमकीचा व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत चर्चा सुरु असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजेंना ‘बाळ’ असे संबोधले. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला माहित आहे, जास्त बोलू नकोस, तुला मी बोललेलो नाही, तुझे बोलायचे कारण नाही, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली अन् या वादावर पडदा पडला. जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विम्याच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. यासंदर्भात आमदार जगजित सिंग राणा पाटील यांनी काही शेतकऱ्यांना निरोप दिला. यामुळे काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. बैठक सुरु होत नसल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली. दरम्यान या बैठकीत दोन्ही नेते हमरीतुमरीवर आल्याचे दिसून आले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा