रस्तेमार्गे करणार ५२० किमी प्रवास
नागपूर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )११ डिसेंबर रोजी हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Samriddhi Highway) उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) आज रविवारी नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही रस्तेमार्गे नागपूर ते शिर्डी असा सुमारे ५२० किमीचा प्रवास करणार आहेत. या दौऱ्यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नागपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या हिंगणा तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या आरंभ स्थळापासून दौरा सुरू होईल. तिथून १२० किमी प्रतितास वेगाने ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना होईल. शिर्डीला पोहोचण्यासाठी सुमारे ६ तासांचा अवधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. या प्रकरल्पाच्या कामाकडे ते प्रारंभीपासूनच बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ११ डिसेंबरला त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन होणार असल्याने. त्यांच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा सोहळाही असणार आहे. उद्घाटन सोहळा असलेल्या ठिकाणाची शनिवारीच त्यांनी पाहणी केली. आज मुख्यमंत्र्यांसोबत ते मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दौऱ्यासाठी पोलिस दलाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने शहरात दाखल झाले. तिथून पुढे महामार्गाच्या आरंभस्थळाकडे रवाना झाले. ताफ्यात पोलिसांचे वाहन अग्रभागी आसेल. त्यापाठोपाठ आठ वाहने असतील. सुमारे १२० किमी प्रतितास वेगाने ताफा धावणार आहे. वेगवान ताफ्याला कुणीही आडवे येणार नाही, संपूर्ण प्रवास सुरळीत व्हावा यासाठी पोलिस दलाकडून उपाययोजना करण्यात आली आहे. रुग्णावाहिकाही तैनात ठेवण्यात आली आहे.
समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील नागपूर व मुंबई या दोन मुख्य शहरांना जोडेल. 10 जिल्ह्यांमधील सर्व इंटरचेंजची रचना व स्थाने समृद्धी महामार्गाच्या मार्गाच्या मसुद्यासह एकाच वेळी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
‘समृद्धी’ची वैशिष्ट्ये
मुंबई ते नागपूर ८ तासांत अंतर पार करण्याचं उदिष्ट
७०१ किमी लांबीचा महामार्ग
महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च
१० जिल्ह्यांमधील ३९० गावांना जोडणारा महामार्ग