बाके, माईकची तोडफोड, विरोधकांचा संताप अनावर
नागपूर. कुठलीही चर्चा न करता विषयपत्रिकेवरील विषयाला मंजुरी दिल्याने सोमवारच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रचंड गदारोळ (Huge uproar in the Zilla Parishad hall) झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इतिवृत्ताची प्रत फाडून फेकली (Members of the opposition party tore up the copy of the minutes and threw). बाके, माईकची तोडफोड (Vandalized desk, mic ) केली. पदाधिकाऱ्यांसोबत वादावादीही केली. अखेर जिप अध्यक्षाला सभा गुंडाळावी लागली. तत्पुवीं, सभा तीन ते चार तास चालली. मात्र, त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांना एकापाठोपाठ मंजुरी देताच सदस्य भडकले. भाजप सदस्य यावेळी आक्रमक होते. तर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना कंभालेंनेही यावेळी विरोधाची भूमिका साकारली. सोमवारला नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील जिल्हा परिषदेची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. नूतन अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यानंतर ही सभा तशी सायंकाळ 5.30 पर्यंत चालली. प्रारंभाच्या तीन तासात सर्वच सदस्य आपापल्या सर्कलमधील विषय सभागृहात मांडण्यासोबतच मंजूरीसाठी येणाऱ्या विषयांवर चर्चेसाठी आतुर होते. त्यामुळे सभागृहात प्रत्येक विषयावर वादळी चर्चा झाली.
जि.प.मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. कॉंग्रेसकडे बहुमत असल्याने विषय पत्रिकेवरील विषय गेल्या अडीच वर्षापासून मंजूर केले जात आहे. मात्र, सोमवारच्या सभेत काहीसे वेगळे चित्र होते. सत्तापक्षातील ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांची साथ विरोधकांना मिळाली. अध्यक्षांनी विषयपत्रिका पुकारली. त्यानंतर ते मंजुरीसाठी पुकारण्यात आले. विषयपत्रिकेतील 1 ते 10 विषय एकापाठोपाठ मंजूर करताच विरोधी पक्ष भडकला. त्यांनी विषयपत्रिकेवर चचेंची मागणी केली. त्याला कंभालेंसह सत्तापक्षातील काही सदस्यांचीही साथ मिळाली. चचेंची मागणी धुडकावत असल्याचे दिसताच विरोधी बाके व सत्तापक्षातील काही सदस्यांमध्ये भडका उडाला. त्यांनी अध्यक्षांनी मंजूर असे पुकारताच काहींनी त्यास अनुमोदनही दिले नसल्याचे सांगितले जाते. मात्र, बहुमत असल्याने विषयपत्रिका मंजूर करण्यात आली.
अन् उडाला संताप
अध्यक्ष बहुमताचा जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करीत असल्याचे दिसताच विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी जोरदार विरोधास सुरूवात केली. सर्वप्रथम नारेबाजी केली. त्यानंतर हातात असलेली विषयपत्रिका फाडून फेकल्या. एवढयावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी सभागृहातील बाके, माईकचीही फेकाफेक केली. भाजपचे गटनेते आतीष उमरे यांच्यासह कॉंग्रेस बंडखोर नाना कंभाले, शिवसेना ( शिंदे गट) संजय झाडे, व्यंकट कारेमोरे, सुभाष गुजरकर आदींनी यात पुढाकार घेतला.
विभागीय आयुक्तांकडे तक्रार?
सभागृहात गोंधळ सुरू असतानाच पदाधिकारी निघून गेले. मात्र, अधिकारी आपम्ल्याच जागेवर बसून होते.नव्या सीईओ सौम्या शर्मा यांचीही ही पहिलीच सभा होती. त्यांनीही हा प्रकार पहिल्यांदाच बघितला. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याची भूमिका विरोधकांनी बोलून दाखविली.