विकृतीचा कळस… श्वानावर हातमजुराकडून अत्याचार

0

पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; गुन्हा दाखल


नागपूर. बलात्काराच्या घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समाजात सर्वत्र घडताना आपण पाहातो. अगदी घरातच नात्यांतील मंडळींपासूनही मुली, महिला सुरक्षित नसल्याचे (Girls and women are not safe even from relatives in the house ) अधोरेखित करणाऱ्या घटना नित्याच्याच आहेत. आजोबाने नातवावर, वडिलांनी मुलीवर, काकाने पुतणीवर बलात्कार केल्याच्या घटना आपण नेहमी वाचतो. पण, नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Hudkeshwar police station limits ) एकाने चक्क कुत्रीवरच अत्याचार केल्याचे (abused on dog ) विकृतीचा कळस ठरावा असे विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी भादंवि कलम 294, 377 तसेच पशुक्रुरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतंतर प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त होतो आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.


देवेंद्र गणपत भगत (40) असे आरोपीचे नाव सांगितले जातो. मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी शिवम ट्रेडर्सच्या समोरील मोकळ्या जागेत, शाहूनगर चौक, मानेवाडा बेसा रोड, हुडकेश्वर या ठिकाणी राहतो. तिथेच हातमजुरीचे काम करतो. तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कोथूलना येथील रहिवासी आहे. बेसा येथील बगिच्यात फिरणाऱ्या एका कुत्रीवर देवेंद्र भगत याने अत्याचार केल्याचे सांगितले जाते. काही नागरिकांना हा गैरप्रकार करताना दिसला. त्याला हटकले असता तो पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेतले.


पुण्यातही घडली होती घटना


यापूर्वीही राज्यात कुत्रीवर बलात्काराच्या घटना घडल्या आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांत 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना घडल्या आहे. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात प्रतीक टाकळकर या 28 वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


प्रतिक टाकळकरच्या तक्रारीनुसार, आरोपी भिवसेन टाकळकर यांनी घरी मादी श्वान पाळली होती. तिला घरात घेऊन आरोपी दार बंद करुन घ्यायचा आणि थोड्या वेळाने बाहेर सोडायचा. त्यानंतर तो आरोपीवर लक्ष ठेवू लागला. त्यानंतर परत असा प्रकार लक्षात आल्यावर त्याने दाराच्या चौकटीतून पाहिल्यावर आरोपी त्या श्वानासोबत लैंगिक कृती करत असल्याचे लक्षात आले होते.