Home Top News केदारांच्या जामीन प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

केदारांच्या जामीन प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

0

नागपूर NAGPUR – नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार SUNIL KEDAR  यांच्यासह सर्व सहा आरोपीना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन आणि शिक्षेला स्थगिती नाकारली आहे यामुळे सुनील केदार यांचा मध्यवर्ती कारागृहोतील मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 152 कोटींच्या रोखे घोटाळा प्रकरणी जेएमएफसी न्यायालयाने त्यांना 5 वर्षे कारावास आणि 1प्रत्येकी 12.5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. काही दिवस प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मेडिकल शासकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 52 या अतिदक्षता विभागात 22 तेच28 डिसेंबर दरम्यान दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या जामीन व शिक्षेच्या स्थगितीवर युक्तिवाद पूर्ण झाला मात्र निर्णय 30 डिसेंबर पर्यंत लांबणीवर गेला होता. तत्पूर्वी केदार यांची प्रकृती ठीक असल्याने मेडिकलमधून सुटी झाली व त्यांची थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.