Nagpur Rain | हवामान खात्याने दिला मोठा इशारा; सोमवारी सर्व शाळांना सुट्टी

0

नागपूर : सोमवारी, २२ जुलै रोजीही पावसाचा धोका वर्तविण्यात आला आहे. पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून शाळांनाही तसे कळविण्यात आले आहे. शनिवारी आलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी उशिरा सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची आणि शाळांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Due to the forecast of heavy rainfall, the District Collector has declared a holiday on Monday 22nd July 2024 for the safety and well-being of all students. Therefore, the school will remain closed.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर जिल्ह्यात दिनांक २१/०७/२०२४ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपुर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागपुर जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार जर अतिमुसळधार पाऊस पडल्यास दिनांक २२ जुलै रोजी नागपुर जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुर जिल्हयातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावीत झाले असून नागपुर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हयातील सर्व अंगणवाडी, शाळा व महावि द्यालये मधिल विद्यार्थाना उद्या दिनांक २२/०७/२०२४ रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.

त्याअर्थी मी, डॉ. विपिन इटणकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपुर मला आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व संदर्भ क्रं. २ शासन परिपत्रक नुसार प्राप्त अधिकारान्वये नागपुर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण नागपुर जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये (नागपुर महानगरपालिका क्षेत्रा सह) दिनांक 22 जुलै, 2024, सोमवार रोजी सुट्टी जाहीर करीत आहे.