सी -२०साठी नागपूर सज्ज

0

आज पाहुण्यांचे आगमन : तयारीच्या अवलोकनासाठी नागपूरकर रस्त्यावर

नागपूर. उपराजधानीत सर्वत्र सध्या जी-20 अंतर्गंत होणाऱ्या सी -20 ची धूम आहे. रविवारी विदेशी पाहुण्यांचे आगमन होणार (Foreign delegates will arrive for the C-20 summit.) आहे. या पार्शवभूमीवर संपूर्ण शहराला नववधुप्रमाणे सजविण्यात आले आहे. शहारातील झगमगाट आणि पालटलेले रुप पाहण्यासाठी नागपूरकर नाईट आउट पर्यटनाला निघाले आहेत (Nagpurkars have left for night out tourism). शनिवारी रात्री उशिरापर्यंत नागरिक फेरफटका मारून तयारीचे अवलोकन करताना दिसले. साऱ्यांनीच डोळ्यांचे पारणे फेडणारी दृष्ये मोबाईलमध्ये कैद करण्यासोबतच सेल्फी काढून घेण्याची हौसही भागवून घेतली. प्रामुख्याने वर्धा मार्ग आणि सिव्हिल लाइन पर्यटकांचे डेस्टिनेशन असल्याचे दिसले. बच्चे कंपनीसुद्धा पालकांसोबत रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवरून बागडताना दिसली. रविवारी तयारीवर अंतीम हात फिरविला जात असून उत्सूकता शिंगेला पोहोचली आहे. नागपुरातील सी-20 च्या मंथनातून वैश्विक स्तरावर धोरण निश्चित होणार आहे. यामुळे अख्ख्या जगाचेच लक्ष नागपुरातील परिषदेकडे लागले आहे.
सी-20 परिषद आणि त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल कुतुहल वाढले आहे. सोबतच, पाहुणे कोण, त्यांची काय व्यवस्था, कुठे फिरणार, काय खाणार, कुठे भेट देणार याबद्दलही वेगवेगळया चर्चा सध्या नागपूरकरांच्या मनात घर करून राहील्या आहेत. त्यातील सर्वात महत्वाची म्हणजे पाहुण्यांसाठी जेवण व मनोरंजनबाबत आहे. शहरात दाखल होताच विदेशी पाहुण्यांना सांबर वडी, झुणक्यासह अस्सल वऱ्हाडी चमचमीत पदार्थांची मेजवानी देण्यात येणार आहे. यात पाया व चिकन सूपसह अस्सल नागपूरी व वैदभिंय भोजन असेल. एवढेच नव्हे तर मनोरंजनासाठी गोंधळ अन् लावणी सोबतच शास्त्रीय संगीताची जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतात सी-20 निमित्त नागपुरात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या भोजनाची जबाबदारी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 20 मार्च रोजी रात्री 8 वाजता तेलंगखेडी गार्डन येथे पाहुण्यांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सुग्रास, स्वादिष्ट आणि रूचकर भोजन ठेवण्यात आले आहे. यात कॉन्टिनेन्टल, अस्सल वऱ्हाडी, दक्षिण भारतीय पदार्थ असणार आहेत. विदेशी पाहुण्यांना स्वागत पेय म्हणून अंबाडी सरबत, आम पान, सोल कढीसह सॉफ्ट ड्रिंक्स – कोक/मिरिंडा/माझा देण्यात येईल. तर सूप व्हेजमध्ये टोमॅटो सार, लिंबू धणे/ गरम आणि आंबट आंबिल असेल. मांसाहारी सुपमध्ये पाय्या सूप, स्वीट कॉर्न चिकन सूप / चिकन क्लियर सूप राहिल.

विदेशी महिला पाहुण्यांसाठी मेहंदी पार्लर
20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पाहुणे फुटाळा येथे संगीत कारंजाचा खेळ पाहाणार आहेत. तिथून ते तेलंगखेडी बगिचात येतील. बगिच्यात गोंधळ, लावणी व चिटकोर हे कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी मोगरा आणि चमेलीच्या गजऱ्याचे स्टॉल राहणार आहे. या शिवाय महिलांसाठी मेहंदी आर्टिस्टही राहाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. फुटाळ्यावर पाहुण्यांसाठी फटाका शोचे आयोजन केले आहे.

संत्रा ज्यूस आणि संत्रा बर्फीही भेट
19 मार्च रोजी सायंकाळी पाहुण्यांचे विमानतळावर आगमन होणार आहे. पाहुण्यांना गुलाबी फेटा बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. या शिवाय खास तयार करून घेतलेले भंडारा मलबेरी सिल्कचे स्टॉल भेट म्हणून देण्यात येणार आहे. या स्टॉलवर इंग्रजी आणि मराठीत जी-20 व सी-20 असे लिहिलेले आहे. पाहुण्यांना संत्रा ज्यूस आणि संत्रा बर्फीही भेट दिली जाईल.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा