वाऱ्याच्या वेगात धावल्या बैलजोड्या

0

केसलवाडा वाघमध्ये रंगला शंकरपटाचा थरार : पहिले बक्षीस मप्रच्या जोडीला

लाखन. भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा वाघ (Kesalwada Wagh in Bhandara district )येथे गेल्या चार दिवसांपासून शंकरपटाचा (Shankarpata ) थरार रंगला होता. स्व. निर्धनराव वाघाये पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्व. लक्ष्मीबाई वाघाये यांच्या पुण्यतिथीनिमित्त या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बैलजोड्यांची शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शौकीनांनी गर्दी केली होती. तौबा गर्दीमुळे केसलवाडा वाघ येथे जत्राच भरल्याचे जाणवले. अगदी जल्लोषाच्या वातावरणात शंकरपट संपन्न झाला. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसोबतच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधूनही (Bhandara, Gondia districts also from Madhya Pradesh and Chhattisgarh ) बैलजोड्या सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. माजी आमदार सेवक वाघाये यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. शंकरपटाचे पहिले बक्षीस मध्यप्रदेशच्या बेहरिया येथील अजीम पटेल यांच्या बैलजोडीने पटकावले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती प्रणाली सारवे, जिल्हा परिषद सदस्य सुर्मिला पटले, ओबीसी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष अड. रवी भूषण भुसारी, सामाजिक कार्यकर्ते अशोक पटले, लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष सरोज वाघाये, मध्यवर्ती बँकेचचे संचालक विलास वाघाये उपस्थित होते.

संपूर्ण स्पर्धाकाळात दर्शकांची गर्दी कायम राहिली. बेहरीया येथील शेतकरी अजीम पटेल यांच्या बैलजोडीने सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर पहिले बक्षीस पटकावले. द्वितीय बक्षीस देवलापार येथील राम लखन दीक्षित तर तृतीय पुरस्कार सुमित दीक्षित, चतुर्थ युवराज तर पाचवे बक्षीस अजीम पटेल यांच्या बैलजोडीने पटकावले. कार्यक्रमाचे संचालन आदित्य वाघाये यांनी केले. भंडारा, गोंदियासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून शंकरपट शौकीनांनी बैलजोड्या आणल्या होत्या. शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील गावांतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

सिनेस्टार हेमंत बिरजेंनी वाढविला उत्साह

केसलवाडा वाघ यथील शंकरपटानिमित्त अवघ्या पंचक्रेशीत उत्साहाचे वातावरण होते. चौथ्या दिवशी सिनेस्टार हेमंत बिरजे यांनीही सोहळ्यात हजेरी लावत स्पर्धाकांचा उत्साह वाढविला. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती. उत्साही तरूणांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतली. सायंकाळी सप्तखंजिरीवादक तुषार सूर्यवंशी महाराज यांचा कीर्तनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. यावेळीही गर्दी कायम होती.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा