Home Breaking news श्रीस्वामी मठ, मालवीय नगर नागपुर येथे नामजपयज्ञ संकल्पपूर्ती सोहोळा व नववर्षाचे स्वागत

श्रीस्वामी मठ, मालवीय नगर नागपुर येथे नामजपयज्ञ संकल्पपूर्ती सोहोळा व नववर्षाचे स्वागत

0

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीस्वामी मठ, मालवीय नगर नागपुर येथे नामजप यज्ञ संकल्पपूर्ती सोहळा तसेच नव वर्षाचे स्वागत, नाम जप यज्ञाचे गुरुवार दि. 25 डिसेंबर ते रविवार दि. 28 डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार दि. 25 डिसेंबर 2025
सकाळी 7.00 वाजता मंगल कलश स्थापना, श्रीस्वामीना रुद्राभिषेक
दुपारी 12.00 वाजता माध्यान्ह आरती, रात्री 7.00 ते 8.30 नित्य उपासना व आरती.

शुक्रवार दि. 26 डिसेंबर 2025
सकाळी 6.30 वाजता मंगल कलश स्थापना व श्रीस्वामीना रुद्राभिषेक
दुपारी 12.00 वाजता माध्यान्ह आरती
संध्याकाळी 5.30 ते 6.30
श्रीस्वामी मठ महिला सेवेकरी मंडळ यांचे भजन

संध्याकाळी 6.30 ते 8.30
भजन कल्लोळ

गायक कलावंत – श्याम देशपांडे, गुणवंत घटवाई ,विनोद वखरे, हेमंत धर्माधिकारी, अजित पाध्ये श्रीकांत पिसे, तबला संगत- मोरेश्वर दहा सहस्त्र
रात्री 8.30 वाजता आरती व प्रसाद.

शनिवार दि. 27 डिसेंबर 2025
सकाळी 7.00 वाजता मंगल कलश स्थापना, श्रीस्वामीना रुद्राभिषेक
दुपारी 12.00 वाजता माध्यान्ह आरती
संध्याकाळी 6.30 ते 8.30
स्वरनाद प्रस्तुत – गजर भक्तीचा गजर स्वामींचा
गायक कलाकार – हिंडोल पेंडसे, यश खेर, मंदार खर्डेनवीस, निधी रानडे, रसिका बावडेकर
वादक कलाकार – आर्य पुराणकर, प्रमोद बावणे, अथर्व शेष, अथर्व मंग रूळकर, विक्रम जोशी
निवेदन – आर्या घटवाई

रविवार दि. 28 डिसेंबर 2025
सकाळी 6.30 वाजता मंगल कलश स्थापना व रुद्राभिषेक
7.00 वाजता यज्ञाला प्रारंभ होईल
यावर्षीचे यजमानपद श्री हरीष व सौ. दीपाली दोडके यांचे कडे असून दुपारी 1.00 वाजता पूर्णाहुति संपन्न होईल.
नंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री 7.00 ते 8.30 श्रीस्वामी मठातील सेवेकरी भजन सेवा सादर करतील.
रात्री 8.30 वाजता आरती व प्रसाद वितरणाने यज्ञ सोहळ्याची सांगता होईल.

बुधवार दि. 31 डिसेंबर 2025

रात्री 10.00 वाजता गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गायक कलाकार – श्याम देशपांडे, आशिष घाटे, श्रीकांत पिसे, मोनिका देशमुख, तबला संगत – श्रीकांत खोल कुटे

वरील सर्व कार्यक्रमांना आपले सर्व तोपरी योगदान देऊन तसेच उपस्थित राहून श्रीस्वामी सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.