NANA PATOLE भावी मुख्यमंत्र्यां’च्या यादीत आता नाना पटोले

0

NAGPUR नागपूर- राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा बोलून दाखविली आहे. तर काही नेत्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे मार्केटींग चालवले आहे. या नेत्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भर पडली आहे. नाना पटोलेंचा उद्या सोमवारी वाढदिवस असल्याच्या निमित्ताने त्यांच्या नागपुरातील समर्थकांनी पोस्टर लावले असून त्यावर पटोलेंचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख करण्यात आलाय.
काही वर्षांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत खळबळ उडविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरेंसह अनेक त्यांचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री असा केला जाऊ लागला. आता त्यात नाना पटोले यांची भर पडली आहे. 5 जून रोजी पटोले यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने नागपुरातील अजनी परिसरात समर्थकांनी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावलेले आहे.