मोहून टाकणारं नवेगावबांध उद्यान

0

गोंदिया GONDIYA -नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात अनेक सुविधा पुरवल्याने मोठ्या प्रमाणात विकएंड साजरा करण्यासाठी पर्यटकांची रेलचेल आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. याठिकाणी तलावात बोटिंगच्या आनंदासोबतच विविध प्रकारच्या प्राण्यांच्या पक्ष्यांचं आणि इतर गोष्टींचा समावेश याठिकाणी होत असल्याने मोठ्या प्रमाणात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी होत असते. यात अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुविधांपासून वंचित होता. परिणामी या उद्यानात पर्यटकांचा कल वाढलेला आहे. नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन पर्यटकांच्या आकर्षणाचे बिंदू ठरली आहे. या ट्रेनमधून फिरण्यासाठी बालकांसोबतच युवक, युवती आणि नागरिक यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विहार करायला येत आहेत. याचसोबत बोटिंग, हॉटेल आणि इतर सुविधा पूरवण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण याठिकाणी दिसून येते. दिवसेंदिवस नवेगाव येथे पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येते.