४० वी सिनियर राष्ट्रीय नेटबॉल पुरुष व महिला स्पर्धा आजपासून

0

नागपूर : महाराष्ट्र अमॅच्युअर नेटबॉल असोसिएशन व नेट बॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 1 ते 4 मार्च दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडांगण येथे 40 वी सीनियर राष्ट्रीय नेटबॉल पुरुष व महिला प्रतियोगिता 2022- 23 आणि सहावी पुरुष व 21 वी महिला अखिल भारतीय आंतर विभागीय नेट बाल प्रतियोगिता 2022-23 आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2023 मध्ये गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ही पात्रता फेरी असणार आहे .सदर स्पर्धेसाठी 27 राज्यातील 936 पुरुष व महिला खेळाडू, पंच, तांत्रिक अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विजयी संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धा नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र अमॅच्युअर नेटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहेत. उद्घाटन 1 मार्चला सकाळी दहा वाजता समारोप 4 मार्च रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.