देसाईंची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी! सुधीर मुनगंटीवार यांनी वाहिली भावांजली

0

मुंबई-कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ही मनाला चटका लावणारी घटना असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. नितीन देसाई हे अतिशय कल्पक असे कलाकार होते. विविध कार्यक्रम व इतर प्रसंगी त्यांनी अतिशय उत्तमोत्तम कलाकृती साकारल्या होत्या. महाराष्ट्र एका महान कलाकाराला मुकला असून अतिशय दुदैवी अशी ही घटना आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले की, देसाई यांनी आत्महत्या करण्याचे काय कारण होते, हे माहिती नाही. आर्थिक विवंचना हे त्यामागील कारण असेल तर देसाई यांच्यात या समस्येवर मात करण्याची प्रतिभा व क्षमता होती. पहिल्या पाच कलाकारांमध्ये त्यांची गणना होत होती. आत्महत्या कुणीही करु नये, असेही मुनगंटीवार म्हणाले.