आता मेट्रो स्टेशनवर ओपन एअर रेस्टॉरंट, कॅफे करा सुरु

0

• महा मेट्रो तर्फे (Expression of Interest)निविदा प्रसारित

नागपूर : महा मेट्रो नागपूर अंतर्गत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सर्वत्र मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहे. यामध्ये आणखी भर घालत नागपूर मेट्रोच्या मेट्रो स्टेशनच्या छतावर उपलब्ध असलेल्या जागेवर ओपन एअर रेस्टॉरंट / कॅफे / भोजनालये सुरू करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट निविदा प्रसारित करण्यात आल्या आहेत. मेट्रो प्रवासा व्यतिरिक्त व्यावासायिक उपक्रमा करिता देखील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद महा मेट्रोला मिळत आहे. अनेक मेट्रो स्टेशनवर व्यावासायिक दुकाने, शैक्षणिक वर्ग, सिनेमा हॉल देखील सुरु झालेले आहे.
उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रो तर्फे नॉन फ़ेयर बॉक्स रेव्हेन्यूच्या माध्यमातून अनेक उपाय योजना केल्या आहेत ज्याला व्यावसायिकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

नागपूर मेट्रो सोबत व्यवसायाच्या सुवर्ण संधी करिता महा मेट्रोच्या वेबसाईट वर देखील या निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मेट्रो स्थानकांवर व्यावासायिक उपक्रमा करिता माहिती करिता नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट विभागाशी संबंध साधावा असे आवाहन महा मेट्रो करित आहे. ओपन एअर रेस्टॉरंट / कॅफे निविदेचा कालावधी दिनांक २४.०५.२०२३ ते २३.०६.२०२३ पर्यंत आहे.

• उपलब्ध मेट्रो स्टेशन :
१. एयरपोर्ट मेट्रो स्टेशन (पश्चिम बाजू)
२. जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन (पूर्व बाजू)
३. जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन (पश्चिम बाजू)
४. शंकर नगर मेट्रो स्टेशन (दक्षिण बाजू)
५. बंसी नगर मेट्रो स्टेशन (उत्तर बाजू)
६. बंसी नगर मेट्रो स्टेशन (दक्षिण बाजू)

नागपूर मेट्रोची प्रवासी वाहुतक सेवा सकाळी ६ ते रात्री १० वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी उपलब्ध आहे.