आता रब्बी पीक विम्याची ‘या’ तारखेपर्यंत करा नोंदणी

0

अमरावती (Amravti) 30 नोव्हेंबर
शासनाने केवळ एक रुपया खर्चुन पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) आणली. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना भलत्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात मोबाइलला आवश्यक तेवढे डाटा नेटवर्क नसते. त्यामुळे पीक पेरा करण्यात शेतकऱ्यांना अडचण येत असते. शहरी किंवा निमशहरी भागात कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन पीक विमा काढावा लागतो. त्यावेळी पीक पेरा केला नसल्यास पीक विमा निघत नाही. ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबर ही ज्वारी पिकाच्या विमा नोंदणीची तारीख असली तरी त्यालाही अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अवकाळी पाऊस, गारपीट, धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते. यासाठी पीक विमा उपयुक्त ठरत आहे. शासनाने अवघ्या एक रुपयात पीक विमा योजना आणली आहे. शेतात पीक पेरणीपूर्वी मशागतीला मोठा खर्च व मेहनत घेतली जाते. शेताची मशागत केल्यानंतर पेरणीपासून काढणीपर्यंत झालेले नुकसान नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.

यासाठी शासनाने रब्बी हंगामातील पिकांसाठी १ रुपयात पीक विमा ही योजना आणली. त्यासाठी पीक पेरा महत्वाचा असतो,पण ग्रामीण भागात मोबदला आवश्यक तेवढे डाटा नेटवर्क नसते. त्यामुळे पीक पेरा करण्यात शेतकऱ्यांना अडचण येत असते. शहरी किंवा निमशहरी भागात कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन पीक विमा काढावा लागतो. त्यावेळी पीक पेरा केला नसल्यास पीक विमा निघत नाही. सातबारा डाऊनलोड करून प्रिंट काढणे, ऑनलाइन अर्ज भरणे यासाठी वेगळी फी भरावी लागते.

शिवाय हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकरी पीक विमा काढण्यास टाळाटाळ करतात. परिणामी नैसर्गिक आपत्तीत आल्यास ते नुकसानभरपाईपासून वंचित राहतात. यामुळे आता हजारो रुपयांचा खर्च करायचे; पण केवळ एक रुपया खर्चुन पीक विमा उतरण्याची शेतकऱ्यांची मानसिकता उरली नाही.

रब्बीचे क्षेत्र आणि सहभागी शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा योजनेत सहभाग असून त्याची मुदत संपत आली आहे. रब्बी हंगामासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सहभागासाठी मुदत – ज्वारी (३० नोव्हेंबर), हरभरा, गहू (१५ डिसेंबर), भुईमूग (३० मार्च )

 

Crop insurance App
List of crop insurance schemes in India
Crop Insurance status
PMFBY Village List
Crop Insurance Scheme introduced in year
PMFBY Beneficiary list
Pilot crop Insurance Scheme
Weather Based Crop Insurance Scheme