अरे व्वा… ताडोब्यात काळ्या बिबट्यांची भर दोन काळे बछडे आढळले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

0

चंद्रपूर:  वाघांची विपूल सख्या आणि जैव विविधतेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve in Chandrapur District ) कायमच वनप्रेमींना आकर्षित करीत असतो. वाघाला पाहण्याची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जंलात येत असतात (Tourists come in large numbers). वाघांसोबतच अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडे व प्राणीही पर्यटकांच्या दृष्टीपथास पडत असतात. यामुळेच अगदी सेलिब्रिटीसुद्धा ताडोबा प्रकल्पाच्या प्रेमात आहेत. आता याच ठिकाणी आणखी एक कुतुहलाची घटना पुढे आली आहे. दुर्मिळ मानले जाणारा काळा बिबट ताडोब्यात यापूर्वी दिसला होता. त्याचे अधिकृत प्रमाण नसले तरी काळा बिबट दिसल्याचा दावा अनेक पर्यटक करीत राहिले आहेत. आता एका मादी बिबट्यासोबत दोन बछडे (Two black leopard cubs ) आढळले. विशेष म्हणजे, हे दोन्ही बछडे काळ्या रंगाचे आहे. उत्साही पर्यटकांने या शावकांचा व्हीडिओ मोबाईलमध्ये कैद केला. आता हाच व्हीडिओ झपाट्याने व्हायरल होत असून हे क्षण बघून पर्यटकही आनंद व्यक्त करीत आहेत.
मदनापूर गेट मधून प्रकल्पात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना या वैशिष्टपूर्ण व दुर्मिश स्वरूपाच्या शावकांचे दर्शन झाले. त्यांनी बिबट आणि काळ्या रंगाच्या दोन बछड्यांचा व्हिडिओ घेण्याचा मोह आवरता आला नाही. काळ्या बिबट्यानंतर काळे बछडे पर्यटकांसाठी नवी पर्वणीच ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मागील सुमारे चार वर्षांपूर्वी ताडोबामध्ये एक काळा बिबट आढळला होता. या बिबट्याचा कोळसा गेट परिसरात वावर होता. त्यानंतर तो ताडोबातील अन्य परिसरातही पर्यटकांना दिसत होता. हा बिबट नर होता. त्याचे अन्य मादी बिबटसोबत समागम होऊन त्यांच्यापासून हे काळे बछडे जन्माला आले असावे, असा अंदाज आहे. हे बछडे नर वा मादी हे मात्र कळू शकले नाही. परंतु या काळ्या बछड्यांमुळे भविष्यात ताडोबात काळ्या बिबट्याची संख्या वाढण्याची शक्यताही काही पर्यटक वर्तवित आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काही पर्यटक मदनापूर गेट परिसरातून सफारीला गेले होते. दरम्यान, त्यांना बिबट मादी आणि तिच्या दोन काळ्या बछड्यांचे दर्शन झाले. व्हिडिओत घनदाट जंगलातून एक बिबट बाहेर येते. त्यानंतर त्या बिबट्याच्या मागे एक काळा बछडा धावत येतो. हे दोघेही दुसऱ्या झुडुपात जात नाही तोच त्यांच्या मागून पुन्हा एक काळा बछडा धावत येत असल्याचे दिसतो.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा