शरद पवारांकडून पुन्हा एकदा ठाकरेंची कोंडी!

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून अनेक मुद्यांवर ठाकरे गटाची कोंडी होत आहे. आता त्यात मुंबईच्या मुद्याचीही भर पडली (Sharad Pawar Autobiography) आहे. “मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो…”, असे पवारांनी “लोक माझे सांगाती” या राजकीय आत्मचरित्रात नमूद केले असून त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप सातत्याने उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याकडून सुरु आहे.
“मुख्यमंत्री असताना त्यांचे (उद्धव ठाकरे) मंत्रालयात फक्त दोनदा जाणे, आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते”, असेही पवारांनी लिहून ठेवले आहे. यापूर्वीही पवार यांनी परखडपणे ठाकरेंच्या विरोधातील भूमिका वारंवार घेतली आहे.

 

तुमच्या भावनांचा आदर करुन १ ते २ दिवसांत निर्णय – शरद पवार

मुंबई : जर कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता तर त्यांचा इतका विरोध पुढे आला नसता, तुमच्यासोबत चर्चा केली असती तर हे चित्र नसते तुमच्या भावनांचा आदर करुन १ ते २ दिवसांत निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा शरद पवार यांनी स्पष्ट केले. दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांना असं बसायला लागणार नाही. मी जो निर्णय घेतला तो चुकीचा होता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन तो निर्णय घेतला पाहिजे होता असे स्पष्ट संकेत मिळाल्याने उद्या काय होणार याविषयीची उत्सुकता सर्वाना लागली आहे