एकटेपणावर खुला संवाद हा उत्‍तम पर्याय – पूनम मेनारिया

0

‘क्रिएटोफोरा’ प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन
नागपूर, 4 मार्च 2023
कोरोनापश्‍चात मोठ्या प्रमाणात भावनिक व मानसिक गुंतागुंत वाढली आहेत. लोक स्‍वत:पुरताच विचार करायला लागले आहेत. त्‍यामुळे एकटेपणा वाढत चालला आहे. यावर खुला संवाद हा एक उत्‍तम पर्याय ठरू शकतो. त्‍यासाठी टॉडलर टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने मंच उपलब्‍ध करून द्यावा, असे मत मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक पूनम मेनारिया यांनी व्‍यक्‍त केले.
टॉडलर टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्‍यावतीने आयोज‍ित करण्‍यात आलेल्‍या बालशिक्षणावर आधारित आगळ्या – वेगळ्या दोन दिवसीय ‘क्रिएटोफोरा’प्रदर्शनाचे उद्घाटन शन‍िवारी पार पडले. कस्तुरबा भवन, १६५, बजाजनगर झालेल्‍या या कार्यक्रमाला अचिव्‍हर्स स्‍कुलच्‍या संचालिका सपना कटीयार, मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक पूनम मेनारिया, टॉडलर टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्‍या संस्‍थापिका अवंती जोधपूरकर व माधवी जोधपूरकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.
उद्घाटनानंतर झालेल्‍या कार्यशाळेत पूनम मेनारिया यांचे ‘इमोशनल अँड मेंटल वेल बिइंग’ विषयावर आपले विचार मांडले. त्‍या म्‍हणाल्‍या, भावनांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी रिलेशन, रिफ्लेक्‍शन आणि रेझिलियन्‍स या तीन ‘आर’वर भर दिला तर व्‍यक्‍तीचे भावनिक व मानसिक संतुलन राखता येणे शक्‍य होईल. सपना कटीयार यांनी प्रदर्शनीमध्‍ये बालशिक्षणावर आधारित प्रदर्शित करण्‍यात आलेल्‍या मॉडेल्‍सचे कौतूक केले. छोट्या मुलांचा शिक्षकांवर विश्‍वास असतो. मुले त्‍यांचे अनुकरण करतात. त्‍यामुळे किंडरगार्डनच्‍या शिक्षकांनी जबाबदारीने वागले पाह‍िजे, नियोजन करून वर्गात गेले पाह‍िजे, असा सल्‍ला दिला.
अवंती जोधपूरकर यांनी प्रास्‍ताविकातून टॉडलर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्‍या कार्याचा आढावा घेतला. किंडरगार्डनमध्‍ये अनुभवातून शिक्षणावर अधिक भर दिला पाह‍िजे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा जोगळेकर यांनी केले. स्‍नेहा दुबे ह‍िने गणेश वंदना सादर केली तर रेणुका देशमुख यांनी आभार मानले. हे प्रदर्शन 5 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच, दुपारी १२ वाजता बी सॉर्टेडच्‍या संस्‍थापिका सोनल फुके यांचे ‘द सिक्रेट ऑफ क्रिएटींग अॅन इमोशनली सेफ अँड वेल नरीश्‍ड चाईल्‍ड’ विषयावर तर दुपारी ४ वाजता बालगोकुलमच्‍या संस्थापिका व शिक्षणतज्ञ ओजस्विनी जामदार यांचे ‘हाऊ टू चुज द बेस्‍ट प्री-प्रायमरी स्‍कूल फॉर देअर चाईल्‍ड’ विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा