Home Vidarbha दहीहंडीसाठी हातगाड्या हटवल्यामुळे राणा दाम्पत्याला भाजपाकडून विरोध

दहीहंडीसाठी हातगाड्या हटवल्यामुळे राणा दाम्पत्याला भाजपाकडून विरोध

0

 

अमरावती- 11 तारखेला अमरावतीच्या नवहाथे चौकात आ.रवी राणा व खा. नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने तेथील हॉकर्सच्या हातगाड्या हटवून रोजगार बुडवल्याच्या आरोप भाजपचे माजी गटनेते तुषार भारतीय यांनी केला होता. नुकसान झालेल्या 100 हॉकर्सला प्रत्येकी 2100 रुपयाच्या चेकचे वाटप करण्यात आले. त्यामुळे राणा दाम्पत्याला भाजपाकडून अमरावतीमध्ये उघड विरोध होताना दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून नट्या आणता आणतात पण हॉकर्सचा विचार तुम्ही करत नाहीत, कामाच्या भरोशावर मते मिळत नाही म्हणून ,सेलिब्रिटी आणायचे व नेत्यांना गर्दी दाखवायची असा टोला भाजपा माजी गटनेते तुषार भारतीय यांनी राणा दाम्पत्याला लगावला.या ठिकाणी दहीहंडीचा राजकीय वापर होत असेल तर हिंदू कसा सहन करेल? देवेंद्र फडणवीस त्या दहीहंडीला अतिथी म्हणून आले होते ते आयोजक नव्हते मात्र आम्ही त्यांना हे सगळं सांगणार आहे असेही भारतीय यांनी सांगितले.