पंतप्रधान मोदींचा भाजप नेत्यांना सल्ला

0

“चित्रपटांसारख्या विषयांवरील अनावश्यक वक्तव्ये टाळा..”

नवी दिल्ली (new delhi)  चित्रपटांसारख्या विषयावर अनावश्यक विधाने करण्याचे टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना (PM Modi advice to BJP Leaders) दिला आहे. काही जण चित्रपटांबद्धल अनावश्यक विधाने करतात व त्याची प्रसार माध्यमांमध्ये दिवसभर चर्चा सुरु राहते. त्यामुळे अशा वक्तव्यांपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला मोदींनी भाजप नेत्यांना दिलाय. अलिकडेच भाजपच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी ‘पठाण’ (Movie Pathan) चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर (Song Besharam Rang) आक्षेप घेतला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदी यांनीच भाजप नेत्यांना या प्रकारापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भाजप नेत्यांना हा सल्ला दिला. काही जण चित्रपटांबद्धल अनावश्यक विधाने करतात व त्याची प्रसार माध्यमांमध्ये दिवसभर चर्चा सुरु राहते. अशा वक्तव्यांपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला मोदींनी यावेळी दिला. मोदी यांनी यावेळी कुठल्याची चित्रपटाचे वा भाजप नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र, भाजपच्या प्रामुख्याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील नेत्यांनी पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर दिलेली वक्तव्ये गाजली आहे. चित्रपटातील गाणे हिदुंत्वाचा अवमान करणारे असल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. या नेत्यांनी चित्रपटाचा विरोध करण्याचे आवाहन जनतेला केले होते. मध्य प्रदेशात तेथील गृहमंत्र्यांनी चित्रपट राज्यात चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावर चित्रपट सृष्टीतून नाराजीही व्यक्त झाली होती.