गांजा ओढणाऱ्या २० जणांविरुद्ध पोलिसांची कारवाई

0

 

यवतमाळ – अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. गांजा सारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांविरुद्ध कारवाईची मोहीम पोलिस दलाने हाती घेतली आहे. ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या मोहिमेत २० जणांविरुद्ध केसेस करण्यात आल्या आहेत. संघटीत गुन्हेगारीच्या सानिध्यातून व्यसनाधिनता व त्यातून जन्माला येणारी गुन्हेगारी याचा विचार करून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २० केसेस करण्यात आल्या आहेत. यात यवतमाळ शहर पोलिस ठाणे तीन, अवधूतवाडी तीन, दारव्हा एक, नेर दोन, पुसद शहर तीन, खंडाळा एक, उमरखेड दोन, आर्णी दोन, बाभूळगाव एक आणि वणी दोन या प्रमाणे केसेस करण्यात आल्या आहेत.