
नागपूर : दिनांक ०२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त कोराडी पोलीस स्टेशन येथे उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगुरुदेव सेवा मंडळ महादुला,कोराडी,नांदा यांच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. पोलीस निरीक्षक श्री. पोपटराव धायतोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जयघोष, राष्ट्रवंदना करत पोलीस दिन साजरा करण्यात आला. समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोलीस बांधवांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पोलीस दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. नीलेश सेंडकर, तसेच चिंतामन डाखोळे, राजन मेश्राम, प्रविन राठोड, दीपक भारती, दिपाली बोथरे, आरती ठाकरे, उज्वला ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला कामठी तालुका सेवाधिकारी, ज्येष्ठ नागरिक समिती प्रमुख व शांतता समिती सदस्य श्री. प्रकाश भालेराव, जिल्हा प्रचार प्रमुख श्री. पुंडलीक बाबू चौधरी, ग्रामगीता परीक्षा प्रमुख प्रा. अरविंद चौधरी, शाखाप्रमुख श्री. सुनील बर्गी यांच्यासह चींतामन मेश्राम, सेषराव सपकाळ, दामुभाऊ करडमारे, रामाजी ढेंगरे, बबनराव ढेंगरे, मारोती ढेंगरे, दिलीप ढेंगरे , ईश्वर काकडे, प्रा, नितीन चौधरी पंकज चौधरी, अंम्रुत हिवराळे,संभाजी सोनवणे, रजनी गजभीये,वानखेडे ताई ईत्यादींनी पोलीस दिना च्या शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी इतर गुरुदेव सेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते.




















